Capricorn – Annual Horoscope 2021-2022: मकर राशीच्या व्यक्तींची प्रगतीकडे वाटचाल

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मकर राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. मकर राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखन केले असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मकर : प्रगतीकडे वाटचाल

मकर राशीचक्रातील दहावी रास असून पृथ्वी तत्वाची चर राशी. स्त्रीस्वभावी ही रास असून या राशीचा स्वामी शनि हा आहे. या राशीचे चिन्ह अर्धा भाग मगर व अर्धा भाग हरीण असे संयुक्त रूप आहे. या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे सतत कामात राहणे. कष्ट अथक परिश्रम करणे.

प्रत्येक गोष्टीची गांभीर्यता लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडणे. उधळटपणा, चंचलता या राशीच्या व्यक्तींमध्ये आढळत नाही. प्रत्येक गोष्ट स्वत:च्या मनाप्रमाणे करणे. नियमांचे पालन करणे, समान न्याय देणे, बोलणे-वागणे स्पष्ट असणे. व्यवहारीपणा, महत्वाकांक्षी, अधिकाराची आवड. संयमीपणा, व्यवस्थीत कामाची आखणी या व्यक्तींमध्ये असते.

मकर राशीमध्ये उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा ही नक्षत्रे असतात. मकर रास उत्तराषाढा नक्षत्र यामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये तेजस्वी, अभिमानी, सर्वप्रिय, कार्यसफल मिळवणारी, चांगल्या कार्यात पुढे येऊन काम करणारी, पशुंची आवड. यांचे शरीर स्थूल व मजबूत असते.

मकर राशी श्रवण नक्षत्रातील व्यक्ती सदाचार संपन्न, ईश्वरभक्त, विद्वान, कर्तृत्ववान, विद्याशास्त्राचा व धार्मिक ग्रंथाचा अभ्यास करणारी असतात.

लोकप्रसिद्धी मिळते. तर मकर रास धनिष्ठा नक्षत्राचे वैशिष्ट्य निर्लज, धनाढ्य, पराक्रमीपणा, गर्विष्ठ, गायनप्रिय, साहसी, धर्मावर प्रेम करणी असते. तर अशा स्वभावगुण संपन्न असणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू.

राशीच्या द्वितीय स्थानातून गुरुचे भ्रमण होत असून कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आवक वाढेल. आर्थिक प्रगती करणारा काळ राहील. कर्जाची परतफेड होईल. व्यवसायात बळकटी प्राप्त होईल. छोट्या छोट्या गुंतवणुकी खूप फायदेशीर राहतील.

कमी श्रमात पैसा मिळण्याचा कल राहील. कुटुंबातील तक्रारींचे निवारण होईल. मंगलकार्य घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पदाची प्राप्ती होईल. छोट्या व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रात, बँक क्षेत्रात, सरकारी व्यक्ती, हॉटेल व्यावसायिक यांना शुभ काळ दर्शवितो.

आपल्याच राशीतून शनिचे भ्रमण होत असून साडेसातीच्या मधल्या कालखंड सुरू आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीत फारशी वाढ झाली नसली तरी कोणत्या प्रकारची हानी होणार नाही असे दर्शविते. फक्त तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे फळ येणाऱ्या कालखंडात नक्कीच मिळेल.

कष्ट वाढले तरी त्याचे चीज होईल हे निश्‍चित आत्मविश्वास वाढून काम करावे लागेल. नोकरी व्यवसायात स्थैर्य मिळवण्यासाठी संयमाची गरज आहे. कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल.

दीर्घकाळाची गुंतवणूक होईल. २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ या काळात शनिचे भ्रमण आपल्या धनस्थानातून होत असून, कौटुंबिक सौख्यासाठी कालखंड चांगला आहे. एखादी मनासारखी घटना चांगली घडेल.

राह-केतूचे भ्रमण पंचम व लाभ स्थानातून व मार्च २०२२ नंतर चतुर्थ व दशमातून होणार असून शेअर्स, लॉटरी यामध्ये नुकसान होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात संघर्षाने यश मिळवावे लागेल. तरुणांना प्रेम प्रकरणात मनस्ताप होईल. पैशाची देवाण-घेवाण करताना दक्षता घ्यावी.

हर्षलचे भ्रमण चतुर्थातून, नेपच्यूनचे भ्रमण धनस्थानातून व प्लुटोचे भ्रमण आपल्याच राशीतून होत आहे. घरातील वातावरण अनपेक्षित बदलेल. वाहन चालवताना दक्षता घ्या. जवळच्या व्यक्तीपासून दक्षता घ्यावी. मानसिक व कौटुंबिक स्वास्थ जपावे.

शुभ रंग : हलका ग्रे, पांढरा, आकाशी निळा.

भाग्यरत्न : पाचू व डायमंड या रत्नांचा वापर केल्यास उत्तम राहील.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या ७, १७, २६.

भाग्यकारक वयोवर्षे : १४, २३, ३१, ४१, ५०, ५२, ६९.

उपासना व उपाय : आपण विष्णू व हनुमान यांची उपासना केल्यास ठीक राहील. माकडांना नारळ व पांढरे वस्त्रे दान द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.