Sagittarius – Annual Horoscope 2021-2022: धनु राशीच्या व्यक्तींना मनाला दिलासा देणाऱ्या घटनांचा काळ

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात धनु राशीचे वार्षिक राशी भविष्य 2021-2022. धनु राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा प्रत्येकवर्षी दिवाळी अंकात आवडता विषय असतो. प्रत्येक दिवाळी अंकात राशी भविष्याचे स्थान असते असे दिसून येते. प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय दडले आहे याची उत्सुकता असते. वास्तविक जोतिषशास्त्र हे गूढशास्त्र आहे.

आकाशात ग्रह व पृथ्वीवरील मानवी जीवन यांचासंबंध कसा काय हे ग्रह मनुष्याच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकतील. अशा प्रकारच्या शंका घेऊन त्यावर वाद विवाद करणारी पुष्कळ विद्वान मंडळीआपणास भेटली असतीलच. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रदृष्या ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर घडून येतात हीगोष्ट व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे व्यक्ती हजारो आहेत. त्याही आपणास भेटल्या असतील.

यापूर्वी अनेक ऋषीमुनींनी अभ्यास करून त्यांच्या अंतर्ज्ञानाच्या शक्तीद्वारे पुराणात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आधुनिकशास्त्रकार देखील ग्रहगोळांचा चुंबकीय आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवरील प्राणी जीवनावर होत असतो, असे म्हणतात.

आचार्यांच्या प्राचीन 14 विद्यांपैकी ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे. असो ह्या वर्षी प्रत्येक वर्षाप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव व नक्षत्रानुसारही विचार करून व प्रत्येक राशीचे गोचर प्रमुख ग्रहस्थितीचा अभ्यास करून वार्षिक राशीचे भविष्य लेखनकेळे असून त्याचबरोबर शुभरंग, उपाय, उपासना दिली आहे.

उपासना ही ग्रह गोचरीने प्रत्येक राशीला ग्रहाचे बलाबल पाहून दिली आहे. त्यांचा उपयोग आपणांस होईल, असे वाटते. इथे राशी भविष्य लिहत असताना फक्त गोचर ग्रह स्थितीचा विचार केला आहे. वाचकांनी एखाद्या ग्रहाची फलित हे फक्त गोचर ग्रह स्थितीवर नसते.

त्यासाठी मूळ जन्म पत्रिका, चालू महादशा, अंतर्दशा व तुमचे प्रारब्ध यांचा ही विचार करावा असे मला वाटते. येथे आपल्या चंद्रराशीकडून आम्ही फक्त ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा कसापरिणाम होऊ शकतो याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

धनु : मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडतील

धनु राशीचक्रातील नववी रास असून अग्नितत्वाची द्विस्वभावी पुरुष राशी आहे. राशीचा स्वामी गुरु असून या राशीचे चिन्ह अश्व व मानव असे आहे. म्हणजे कमरेवरचा भाग मनुष्याचा व खालील भाग घोड्याचा. अत्यंत सात्विक, न्यायी, परोपकारी, आशावादी व धर्मउपदेशी या राशीच्या व्यक्ती असतात.

पराक्रम, एकाग्रता, शौर्य असून संकटे, दु:ख दूर करून यश मिळवणे हा गुण प्रामुख्याने सापडतो. भारदस्त व्यक्तिमत्व, सुसंस्कृतपणा, समाजावर चटकन छाप पाडणारी व्यक्ती असतात. प्रांजळ व मोकळा स्वभाव एखाद्या संस्थेची मनापासून सेवा करणे, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची कला. योग्य मार्गदर्शन, कायदा व सुव्यवस्था यांची उत्तम सांगड घालून काम करण्याची कला यांच्याकडे उत्तम असते.

आदर्शवादी व्यक्तिमत्व असते. धनु राशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा ही नक्षत्रे येतात.धनु रास मूळ नक्षत्राची व्यक्ती सशक्त, दणकट, बलवान, धाडसी काही प्रमाणात चंचल स्वभावाची व एकांतप्रिय असतात. यांना मुळात श्रेष्ठत्व गाजविण्यास आवडते.

धनुरास पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती गर्विष्ठ, मैत्री कायम टिकवणाऱ्या, बलवान, धनवान, सामान्य, बुद्धिमत्ता, पैशांचा लोभ असणाऱ्य अशा असतात. यांना आनंदी व सुस्वभावाची प्राप्ती होते. नोकरीची आवड असणारे. तर लबाडीच्या व्यवहारात फसगत होणारे असतात.

धनुरास उत्तराषाढा नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आशावादी, महत्वाकांक्षी, शिक्षणाची आवड असणारे, तीव्र इच्छाशक्ती, शांत स्वभाव, धार्मिक व नम्र असतात. तर धार्मिकता जपणारी व विचारांचा ताळमेळ साधून समाजात वावरणाऱ्या धनु राशीच्या व्यक्तींचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

राशीच्या तृतीयस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण आपणास शुभकारक असेल. भावंडांच्या दृष्टीने शुभघटना घडतील. उंची वस्तू यांची प्राप्ती होईल. उत्पन्न वाढेल. मोठे लाभ होतील. प्रवास योग, तीर्थयात्रा होतील. विवाहेइच्छुकांचे विवाह जमतील. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना हे वर्ष उत्तम राहील. कोर्टकचेरीतील कामे मार्गी लागतील.

नोकरीमध्ये बदल संभवतो.धार्मिक ग्रंथाचे वाचन, लिखाण होईल. सामाजिक, धार्मिक संस्था अशा संस्थेमध्ये संघटक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार या क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी, मनासारख्या घटना, चाहते वर्गाकडून फायदा संभवतो.

राशीच्या द्वितीय स्थानातून शनिचे भ्रमण होत असून आप्तवर्ग कुटुंबातील व्यक्तींशी जूळवून घ्यावे लागेल. आर्थिक स्थिती सुधारून गुंतवणुकीकडे कल राहील. मानसिक स्थिती अधूनमधून बिघडण्याची शक्यता राहील. जुने शास्त्र, जुनी विद्या, गूढ शास्त्र, साहित्य यातून अर्थप्राप्ती होईल.

नातेवाईकांकडून दिलासा देणाऱ्या घटना घडतील. २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ या काळात शनिचे भ्रमण तृतीय स्थानातून होणार आहे. काहींना सुटकेचा दिलासा. जनसंपर्क वाढेल. भावाबहिणींचे गैरसमज दूर होतील. महत्वाचे कागदपत्र, पत्रव्यवहार, कागदपत्रे यांचे उत्तर समाधानकारक येईल.

राशीच्या षष्ठ व व्ययस्थानातून राह-केतूचे भ्रमण होत असून, मार्च २०२२ नंतर पंचम व लाभस्थानातून होणार आहे. हाता खालच्या लोकांकडून फसवणूक, नोकरीमध्ये दूरवरची बदली, चुकीच्या औषधाने त्रास. अशा गोष्टी संभवतात. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

विद्यार्थ्यांना झगडून यश प्राप्त करावे लागेल. हर्षलचे भ्रमण पंचमातून, नेपच्यूनचे भ्रमण तृतीय स्थानातून, प्लुटोचे भ्रमण द्वितीय स्थानातून होत असून, संततीशी मतभेद, दगदग कष्ट वाढतील. गूढ विद्येचे आकर्षण राहील.

शुभरंग : चमकदार पिवळा, लाल, डाळींबी.

भाग्यरत्न : आपण माणिक, टोपाझ रत्नाचा वापर करावा.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, ३०.

भाग्यकार वयोवर्ष : १८, २२, ३४, ४३, ५४, ६३.

उपासना व उपाय : आपण दत्त सांप्रदायातील देवतेंची उपासना केल्यास उत्तम राहील. शंकराला दुग्ध अभिषेक करावा. फळभाज्या दान कराव्यात. पांढऱ्या चंदनाचा गंध कपाळावर लावावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.