Pimpri – राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल विजयी

एमपीसी न्यूज  – शिर्डी येथे झालेल्या सब ज्युनिअर व  ज्युनिअर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या पी.के. इंटरनॅशनल स्कूलच्या ज्युनिअर गटामध्ये  या लगोरी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला .विजयी संघात सौरभ डांगे ,कश्यप जोशी ,गौरव भालेकर ,प्रज्वल वाघमारे , देवेश महाडिक , केतन सोनवणे , मधुर शिंदे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. 
 
या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण २० जिल्हे सामील झाले होते.विजयी संघाचं अभिनंदन शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे,  मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर , अनिता साने, पर्यवेक्षक संगीता पराळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी तसेच पिंपरी चिंचवडचे लगोरी सचिव राजू गोसावी, नंदू  वाळके यांनी अभिनंदन केले . या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक राहुल कोरे व सैनाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले . 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.