PCMC : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – जागतिक पर्यावरण दिन म्हणून 5 जून हा दिवस  जगभरात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पिंपरी (PCMC)  -चिंचवड महापालिकेच्या वतीने देखील दरवर्षी राबविण्यात येतात. तसेच या वर्षीही विविध कृती कार्यक्रम उद्यान विभागामार्फत शहरात राबविण्यात आले.

Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या अवैध वृक्षतोडीबाबत मंत्रालयासमोर आंदोलन

‘अ’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बर्ड व्हॅली उद्यानासमोर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपायुक्त उद्यान विभाग रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड व अंध प्रतिनिधी प्रकाश कुटे, सुनील सूर्यवंशी, संजय पारधी उपस्थित होते.

‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत मस्के वस्ती येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास ब क्षेत्रिय कार्यालयांतर्गत रावेत म्हस्के वस्ती येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास ब क्षेत्रिय अधिकारी अमित पंडित व सहाय्यक उद्यान निरीक्षक गजरमल तसेच आरोग्य व उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

‘क’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत टेल्को मटेरियल गेट क्रांती चौक येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी क क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे व सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे,विविध विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

‘ड’ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत प्रभाग कार्यालयासमोर बी आर टी डिवाइडर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, सहाय्यक हॉर्टिकल्चर सुपरवायझर गोपाळ खैरे उपस्थित होते.

‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वडमुख वाडी जलतरण तलाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी ई क्षेत्रिय अधिकारी राजेश आगळे, उद्यान निरीक्षक, दत्तात्रय आढळे व सहाय्यक हॉर्टिकल्चर सुपरवायझर भानुदास तापकीर उपस्थित होते.

‘ग’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थेरगाव बोट क्लब येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

‘ह’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत पर्यावरण संस्कार केंद्र एमआयडीसी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याच्या आवाहनास खाजगी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला. भोसरी येथील वंडर कार्स प्रायव्हेट लिमिटेड च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःहून वृक्षारोपण करण्याची तयारी दर्शवली आणि भोसरी निगडी रस्त्यावर त्यांनी वृक्षारोपण केले. कंपनीचे वरिष्ठ संपर्क व्यवस्थापक धनंजय माने यांनी वृक्षारोपण केले, यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधीक्षक मंजुषा हिंगे, कंपनीचे संपर्क व्यवस्थापक प्रवीण कांबळे, संजय पानवळकर, पुष्कर सोनवणे, नंदू चव्हाण सुनील पहिलवान उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.