Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या अवैध वृक्षतोडीबाबत मंत्रालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ( Pimpri) अवैध वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राऊळ यांनी जागतिक पर्यावरण दिनादिवशी (सोमवार, दि. 5) मुंबई येथील मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. पिंपरी-चिंचवडमधून सायकलवर जाऊन हे उपोषण करण्यात आले.

प्रशांत राऊळ म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात सन 2016 पासून अवैधपणे वृक्षतोड सुरु आहे. सुमारे दोन हजार वृक्षांची कत्तल होत असताना आपण स्वतः प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील अवैध वृक्षतोड सातत्याने निदर्शनास येत असतानाही पालिका प्रशासन शांत आहे. महापालिका प्रशासन या अवैध वृक्षतोडीमध्ये सामील आहे. शहरात वृक्ष अधिनियम 1975 आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा या कायद्यांचे पालन होत नाही.

राऊळ पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड मध्ये न्याय मिळत नसल्याने मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. याबाबत 27 एप्रिल रोजी मंत्रालयातील संबंधित विभागांना निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा देखील केला. त्यावेळी मंत्रालयासमोर उपोषण करता येणार नाही, याबाबत कुणीही सांगितले नाही. उपोषणाला बसल्यानंतर पोलिसांनी ‘इथून आझाद मैदानात जा. तिथे फॉर्म भरा आणि उपोषणाला बसा’, असा सल्ला दिला.

आझाद मैदानावर गेल्यानंतर पोलीस परवानगीची मागणी करण्यात आली. परवानगी घेण्यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्ज केला असता पोलिसांनी परवानगी देण्यासाठी ( Pimpri) सहा तास लावले. पाचला दहा मिनिटे कमी असताना पोलिसांनी परवानगी दिली.

Gahunje : पत्नीने घेतला पतीचा जीव; मृताच्या नातेवाईकांचा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

आज पर्यावरण दिन आहे. पर्यावरण दिनानिमित्त अशा प्रकारचे आंदोलन होत असल्याचे पुढे येऊ न देण्याचा पोलिसांचा मानस होता. केवळ नावापुरता पर्यावरण दिन साजरा करू नये. पर्यावरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी होत असतील तर नागरिकांनी पुढे यायला हवे. जर कायदे पळायचेच नसतील तर कायदे बनवता कशाला, असा प्रश्न देखील राऊळ यांनी उपस्थित केला आहे. शासनाने एक समिती नेमून पिंपरी चिंचवड मधील अवैध वृक्षतोडीची चौकशी करावी. दोषींवर कठोर शासन करावे. दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना देखील शासन करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.