Gahunje : पत्नीने घेतला पतीचा जीव; मृताच्या नातेवाईकांचा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे रविवारी (दि. 4) दुपारी पत्नीने पतीवर चाकूने (Gahunje) वार करत निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी (दि. 5) दुपारी मृत पतीच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. आरोपी महिलेच्या आई वडिलांसह अन्य नातेवाईकांची चौकशी करून संशयित वाटल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.

सुरज राजेंद्र काळभोर (वय 29, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. अंकिता सुरज काळभोर हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुरज यांच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी सकाळी अंकिताने सुरज यांना शिरगाव येथे प्रति शिर्डी मंदिरात दर्शनासाठी नेले. तेथून तिने त्यांना गहुंजे येथील तिच्या वडिलांच्या शेतात फिरायला नेले. शेतात फिरत असताना सुरज बेसावध असताना अंकिताने त्यांच्यावर धारदार हत्याराने आणि दगडाने हल्ला करत खून केला असल्याचे सुरज यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Mahavitaran : महावितरणच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या सौर रथयात्रेला प्रारंभ

सोमवारी दुपारी पुन्हा सुरज यांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. तिथे नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. सुरजचा खून हा अत्यंत थंड डोक्याने आणि सुनियोजितपणे केला (Gahunje) आहे. त्यामुळे हा प्रकार अन्य लोकांच्या सहमतीने झाला असल्याचा संशय सुरज यांच्या नातेवाईकांना आहे.

याबाबत अंकिताचे आई, वडील, भाऊ, मावशी, मामा, यांच्यासह अन्य नातेवाईकांकडे पोलिसांनी कसून चौकशी करावी. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. तसेच सदर गुन्ह्यात 120 (ब) आणि 34 अशी कलमवाढ करावी, असे नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.