Pune News : अग्निशमन सेवा शुल्कास मान्यता

एमपीसी न्यूज – अग्निशमन दलाकडून उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणाऱ्या 500 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या आणि 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतींना अनुक्रमे 25 रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि 50 रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे.

रासने पुढे म्हणाले, 15 ते 40 मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर 100 रुपये (किमान एक लाख रुपये), 40 ते 70 मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 250 रुपये (किमान अडीच लाख रुपये), 70 ते 100 मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर 400 रुपये (किमान चार लाख रुपये), 100 ते 150 मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 500 रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि 150 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर 600 रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.