Pune News : बेघरांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्पाला मंजुरी

एमपीसी न्यूज – पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, सध्या येरवडा, सेनादत्त पेठ, बोपोडी, पुणे स्टेशन भागात बेघरांसाठी निवारा प्रकल्प राबविण्यात येतात. त्यांची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट, ओबीसी सेवा संघ, जान्हवी फाउंडेशन, अक्षरसृष्टी ग्रंथालय या संस्थांची निवड करण्यात आली आहे.

रासने पुढे म्हणाले, या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तो उपलब्ध झाला नाही तर दोन कोटी रुपयांची तरतूद असललेल्या युवक कल्याण निधी अंतर्गत हा खर्च केला जाईल. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र उभे करायचे आहे. त्यानुसार ३८ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात ३८ निवारा केंद्र उभी करण्याची योजना आहे. जशी जागा उपलब्ध होईल त्यानुसार आगामी काळात ही केंद्र उभी केली जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.