Pune News : कोरोना मृतांच्या कुटुंबियांना सामान्य करात १०० टक्के सवलत

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना पुढील आर्थिक वर्षात सामान्य करात शंभर टक्के सवलत देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरात आजपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळले. काही कुटुंबात आई-वडिल असे दोघांचा मृत्यू झाल्याने पाल्य अनाथ झाले.

या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी सामान्य करात शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियाच्या मालमत्तांची नाव हस्तांतरण करण्यासाठी आकारण्यात येणारी वारसा फी माफ करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.