BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : अभियंता तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पीएमपी बस चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुचाकीला जोरात धडक दिल्याने अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) दुपारी पावणे दोनच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे महिंद्रा कंपनीसमोर झाला. याप्रकरणी पीएमपी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक विजयन कोंजीपुरमबिल (वय 25), असे मृत्यू झालेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सत्यन कृष्णनकुट्टी कोंजीपूरमबिल (वय 49, रा. मालाड ईस्ट, त्रिवेणीनगर, मुंबई) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बस चालक बबन सुखदेव बोराडे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास कार्तिक हा आपल्या दुचाकीवरून चालला होता. तो लांडेवाडी येथे महिंद्रा कंपनीसमोर आला असता भरधाव वेगात आलेल्या पीएमपीच्या बसने (एमएच 12 आरएन 9075) कार्तिक यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने कार्तिक याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पीएमपी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement