PMPML : पालिकेतील 100 चालकांना पीएमपीत रूजू व्हावे लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पीएमपीएलच्या वर्ग ( PMPML) झालेल्या 100 बसचालकांना तत्काळ पीएमपीमध्ये रुजू होण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक सुचेंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे. तसेच पीएमपीमध्ये त्वरीत रुजू न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा असा इशारा दिल्यामुळे 38 चालक पीएमपीमध्ये रूजू झाले आहेत.

Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघ निवड

पीएमपीएलच्या ताफ्यात नवीन बसगाड्या मोठ्या संख्येने सामील होत आहेत. त्यामुळे बस चालकांची संख्या अपुरी पडत आहे. परिणामी, कंत्राटी चालक नेमावे लागत आहे. त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. चालकांचा तुटवडा भरून काढण्यासाठी पीएमपीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केलेल्या 100 चालकांना पुन्हा पीएमपीमध्ये तातडीने रूजू होण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

त्यानुसार पालिकेतील 38 चालक पीएमपीएलमध्ये रूजू झाले आहे. उर्वरित चालक रूजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक सिंह यांनी दिला आहे.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, पीएमपीकडे बस चालकांची कमतरता आहे. त्यामुळे पीएमपीने महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या 100 चालकांना माघारी बोलविले आहे. तसे, आदेश त्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून त्या कर्मचाऱ्यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही सुरू ( PMPML) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.