PMPML : पर्यटनाला जा पीएमपी बस घेऊन; शैक्षणिक संस्थांना 25 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – सहल, पर्यटन, लग्न समारंभ आणि (PMPML )इतर कार्यक्रमांसाठी जशी एसटी बस भाड्याने मिळते, तशीच सोय पीएमपीने देखील केली आहे. याला नागरिक, शैक्षणिक संस्था आणि खासगी कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पीएमपीकडून आलिशान इलेक्ट्रिक बस देखील भाड्याने (PMPML)दिल्या जात आहेत. या बस सवलतीच्या दरात मिळत आहेत. नागरिकांना ग्रुपने एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी जायचे असेल तर त्यांना देखील पीएमपी बस भाड्याने घेता येईल. त्यासोबत लग्न समारंभासाठी आणि आयटी कंपनी, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी देखील पीएमपी बस मिळत आहेत.

Khed : घर खरेदीच्या व्यवहारात नागरिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

पीएमपीच्या ताफ्यात नवीन आलिशान सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कमी खर्चात सुखद प्रवास’ या उक्तीने पीएमपीकडून ही सेवा पुरवली जात आहे.

हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. पुणे शहरातील शाळांना अशा शैक्षणिक सहलींसाठी पीएमपी 25 टक्के सवलतीत बस सेवा उपलब्ध करून देत आहे.

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर म्हणाले, “प्रवाशांच्या सुविधेसाठी हा नवीन करार करण्यात आला आहे. शहरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.