PMRDA : ड्रोन प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादरीकरण

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) ड्रोन प्रकल्पाचे हैद्राराबाद येथे झालेल्या Geo Smart 2023 आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादरीकरण करण्यात आले.

17 ते 19 आक्टोंबर या कालवधीमध्ये Geo Smart 2023 आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हैद्राराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली, GPS प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान प्रसार करण्याकरिता विविध देशातील नामवंत एजन्सींनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता.

या कॉन्फरन्स मधे Remote Sensing, GIS, GPS या भौगोलिक महिती तंत्रज्ञान (Geospatial) माहितीचे अदान प्रदान करण्यात आले. याबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये GIS मध्ये कामकाज करण्याऱ्या Indian Space Research Organization (ISRO) व National Remote Sensing Centre (NRSC) तसेच इतर शासकीय/निमशासकीय तसेच खाजगी संस्थाचे तंत्रज्ञान सामान्य माणसांसाठी कसे उपयुक्त ठरत आहे यावर सादरीकरण केली जात आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इन-हाऊस ड्रोन वापर करणारे प्राधिकरण असून ड्रोनद्वारे प्राधिकरण कार्यालयामध्ये करत असलेल्या कामाचे सादरीकरण माजी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले. यामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, नगर रचना योजनाचे नियोजन, सुविधा भूखंडाचे हस्तांतरण, 65 मीटर इनर रिंग रोडचा प्रकल्प अहवालबाबत सादरीकरण केले आहे.

Manoj Jarange Patil Live Update : शांततेचं युद्धच मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार- मनोज जरांगे पाटील

इस्रोचे माजी चेअरमन किरण कुमार यांनी शासकीय विभागामध्ये ड्रोनवापर संकल्पनेचे अभिनंदन केले असून प्राधिकरण (PMRDA) कार्यालयाच्या ड्रोनवापराबाबत Geo Smart 2023 मध्ये प्रशंसा होत आहे.

“प्राधिकरणामार्फत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून नगररचना योजनांचे नियोजन, रिंगरोड नियोजन, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठीचा अभ्यास करण्यात आला. या सर्व प्रकारच्या अंमलबजावणी मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.