Nigdi : लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुक्त रुग्णाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्याप्रकरणी माजी महापौरांसह चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुक्त महिलेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. याप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 30) दुपारी अडीच वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
नगरसेविका मंगला कदम, अमेय सुधीर नेरुरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी (सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दाम्पत्य कोरोनामुक्त होऊन गुरुवारी घरी परतले. त्यावेळी त्या दाम्पत्त्याचा ढोल ताशा आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी बेकायदेशीर जमाव एकत्र आला. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली. तसेच शासनाने दिलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.