Pimpri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी पांगवण्यासाठी पोलीस रस्त्यावर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमधील गर्दी पांगवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी (दि.15) पोलिसांनी पिंपरी कॅम्प परिसरात नागरिकांना कारवाईचा इशारा देत गर्दी पांगवली.

पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून ही संख्या नऊवर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व शाळा, मॉल्स, जलतरण तलाव, बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी रविवारी नागरिकांनी खरेदीसाठी पिंपरी कॅम्प येथील बाजार पेठेत गर्दी केली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कॅम्प परीसरात धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले की, “विनाकारण गर्दी करू नका, मास्क वापरा असे आवाहन पोलिसांनी केले. तसेच, पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. त्यामुळे काही वेळातच कॅम्प परिसरातील गर्दी कमी झाली. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून यापूर्वीच करण्यात आले. तरी देखील काहीजण काही ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत. आता अशा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.