Pune : पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, महापालिकेची मीमद्वारे जनजागृती

एमपीसी न्यूज – अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर पुण्यात उष्णतेची लाट येणार असनू पारा 40 अशांच्यावर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Pune) याच पार्श्वभुमीवर पुणे माहापालिकेने मात्र भन्नाट मीमद्वारे उष्णतेची पूर्व कल्पना व उपाय योजना यांची माहिती दिली आहे जी पुणेकरांना जाम आवडली असून हे मीम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Chinchwad : महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी  – शंकर गायकर

हवामान खात्याने दर्शविल्याप्रमाणे पुण्याचे आजचे तापमान कमाल तापमान 39.2 तर किमान तापमान हे 20.4 अंश सेल्सीयस नोंदविण्यात आले आहे. हा पारा आणखी वाढ्ण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबरोबरच परिसरात वादळी वारा व विजांसह पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. उन्हाचा कडाका व अवकाळी पावसाचा तडाखा त्यामुळे पुणेकरांना घराबाहेर पडताना नेहमी काळजी घ्यावी लागत आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर पुणे महापालिकेने नागरिकांना उष्माघातापासून वाचण्यासाठी आवाहन केले असून नेटकऱ्यांना त्यांच्याच भाषेत म्हणजे मीम द्वारे जनजागृती केली आहे (Pune). सध्या सोशल मिडीयावर हे मीम चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.