Talegaon : तळेगाव-चाकण मार्गावर कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण मार्गावर इंदोरी येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून कंटेनर पलटी झाला. (Talegaon) यामध्ये कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.

अशोक रघुनाथ वर्मा (वय 43, रा. कल्याण ठाणे) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पांडे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, महापालिकेची मीमद्वारे जनजागृती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर तळेगाव चाकण रस्त्याने घेऊन जात होते. इंदोरी येथे आल्यानंतर त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर (Talegaon) वरील नियंत्रण सुटून कंटेनर रस्त्याच्या खाली पलटी झाला. यामध्ये अशोक वर्मा यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.