Talegaon Dabhade : उच्चशिक्षण सहसंचालक डाॅ किरणकुमार बोंदर यांची इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट!

एमपीसी न्यूज – पुणे विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक (Talegaon Dabhade) डाॅ किरणकुमार बोंदर यांनी बुधवार (दि 19) इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. 

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या वाटचालीबद्दल डाॅ बोंदर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या  नवनवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या शुभ हस्ते उच्चशिक्षण सहसंचालक पुणे डाॅ किरणकुमार बोंदर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी  संस्थेचे खजिनदार शैलेशभाई शहा, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Talegaon : तळेगाव-चाकण मार्गावर कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

याप्रसंगी प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. डाॅ बोंदर यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीचा गौरव करत त्यांनी महाविद्यालयास आजपर्यंत केलेल्या मदतीचा लेखाजोखा उपस्थितांपुढे मांडला. तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल मा.सहसंचालक यांच्याकडे सादर केला. (Talegaon Dabhade) कार्यक्रमाचा समारोप करताना कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की, चांगल्या कामासाठी डाॅ बोंदर यांचे महाविद्यालयास नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करत डाॅ बोंदर यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

डाॅ बोंदर यांनी संस्थेच्या कामाचे केले कौतुक

डाॅ बोंदर यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करत संस्थेने स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भव्य व अद्यावत सोयी सुविधांनी युक्त असलेली प्रशस्त इमारत उभी करत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा व पदाधिकारी आणि सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.

संस्थेने शासनाकडे नवीन महाविद्यालय, विद्याशाखा, तुकडीवाढ, विषयवाढीचे प्रस्ताव सादर केल्यास त्यास प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल तसेच नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे (Talegaon Dabhade) असून शिक्षकांनी जास्तीत जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यी घडवावेत असे आवाहन त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.