Chinchwad : महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी  – शंकर गायकर

एमपीसी न्यूज – “महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. (Chinchwad) उत्तुंग कर्तृत्व अन् देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा महापुरुषांचे स्मरण करणे अत्यावश्यक कर्तव्य ठरते, असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी व्यक्त केले.

ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे मंगळवारी (दि.18), क्रांतिवीर चापेकर बंधूच्या 125 व्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड संघचालक विनोद बन्सल, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, सहकार्यवाह रवींद्र नामदे, (Chinchwad) डॉ. नीता मोहिते, संजय कुलकर्णी, अशोक पारखी, नितीन बारणे, गतिराम भोईर, शाहीर आसराम कसबे, कांता जाधव आदी उपस्थित होते.यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.

Gold Price in Pune : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोनं महागलं! पाहा पुण्यातील आजचे दर

आपल्या अभिनिवेशपूर्ण शैलीतून शंकर गायकर पुढे म्हणाले की, “आपल्या गर्भातील बाळावर देशभक्तीचा संस्कार करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांचे स्वराज्याप्रति अमूल्य योगदान आहे. संभाजीराजे यांच्यापासून हिंदुस्थानातील तमाम क्रांतिकारकांचे स्मरण करणे हे उचित कर्म आहे. त्यामुळे हा केवळ स्मृतिदिन नाही; तर शौर्यदिन आहे. शाहिस्तेखानाला दिलेला धडा आणि ‘गोंद्या आला रे!’ अशा इतिहासातील अनेक ऊर्जादायी प्रसंगांचे कायम स्मरण केले पाहिजे.

गुरू गोविंदसिंगांपासून ते विनायक दामोदर सावरकरांपर्यंत असंख्य क्रांतिवीरांनी देशाच्या मातीसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे संपूर्ण खानदान एकत्रित केले तरी कोणी सावरकर होऊ शकत नाही.(Chinchwad) काळाच्या जबड्यात हात घालून क्रांतिकारकांनी या देशाचा इतिहास निर्माण केला आहे. तो इतिहास आम्हाला सहजपणे विसरता येणार नाही. विविध पंथ असलेतरी आम्ही सर्व हिंदू एक आहोत.

सत्कार सोहळ्यानंतर योगेश सोमण निर्मित ‘द प्लॅन’ या ब्रिटिश अधिकारी रॅण्ड आणि जॅक्सन यांच्या वधाचा इतिहास चित्रीत करणाऱ्या दीर्घांकाचे सादरीकरण करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश अगज्ञान यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.