Gold Price in Pune : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तापूर्वी सोनं महागलं! पाहा पुण्यातील आजचे दर

एमपीसी न्यूज़ –  अक्षय्यतृतीया जवळ आल्याने  सर्वांना सोनं खरेदीचे वेध लागले आहेत. मात्र ऐन अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोन महागलं आहे. (Gold Price in Pune) पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,400 एवढा असून काल पासून  200 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,200 एवढा होता. 

अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त माणण्यात येते. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारामध्ये मोठी उलाढल असते. कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची  खरेदी विक्री होते. मात्र सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तुम्हाला जर अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायची असेल तर जाणून घ्या पुण्यातील आजचे दर.

Pune : अखेर त्या अपघातानंतर बोरघाटात लोखंडी सुरक्षा कठडा

पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,400 एवढा असून काल पासून  200 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,200 एवढा होता. (Gold Price in Pune) आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,160  एवढा असून काल पासून ₹90 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60,250 एवढा होता. तसेच  22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 57,440 एवढा असून काल पेक्षा ₹80 नी कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,520 एवढा होता.

तर चांदी चा भाव मात्र ₹2000 नी कमी झाल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹78,000 एवढा आहे.  मागील काही दिवस चांदीचा भाव 1 किलो ला ₹80,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.