Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या दहावी-बारावीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) इयत्ता दहावी व बारावीचा (Chinchwad) निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा यंदाच्यावर्षी देखील कायम ठेवली असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅवीस, उपप्राचार्या लिजा सोजू, समन्वयक कविता देशपांडे यांचे सर्व विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

शाळेतील दहावीमध्ये अन्वी शिंदे 96.60 टक्के प्रथम क्रमांक, शर्वरी देशमुख 95 टक्के द्वितीय क्रमांक, तनुश्री म्हस्के 95 टक्के द्वितीय क्रमांक, रिषित मिस्त्री 94.60 टक्के तृतीय क्रमांक, सुयश नाईक 94.40 टक्के चतुर्थ क्रमांक प्रणव नेहेते 94 टक्के पंचम क्रमांक, आर्ची सोनिगरा 94 टक्के पंचम क्रमांक संपादन केला. तसेच; 100 विद्यार्थ्यांपैकी 90 टक्केच्या वर 19 विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहे. 10 वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक श्यामसुंदर कांगणे, भरत बिर्‍हाडे, अनु थॉम्पसन, पुनम शिरोरे, विशांत चंद्रन व सौम्या दास यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Talegaon : पतसंस्थेत 82 लाखांचा गैरव्यवहार; दोन महिला लिपीकावर गुन्हा दाखल

महाविद्यालयातील 12वी अयुषी चौधरी 96.80 टक्के प्रथम क्रमांक, मधुरा देशमुख 94.80 टक्के द्वितीय क्रमांक, तनुश्री (Chinchwad) जगदाळे 94.40 टक्के तृतीय क्रमांक, फबेहा अन्सारी 93 टक्के चतुर्थ क्रमांक, अश्विन सांगोकर 92.60 टक्के पंचम क्रमांक, मोहम्मद अझिम असिफ खान पठाण 92.60 टक्के पंचम क्रमांक, आकांक्षा थोरात 92.40 टक्के क्रमांक संपादन केला. शिक्षक राजेंद्र सोनार, अभिजित डोंगरे, राजेंद्र मामिडी, शिक्षिका जसलीन कौर, भाग्यश्री शिर्के व जीबी जॉर्ज यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

शाळेच्या व विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.