Talegaon : पतसंस्थेत 82 लाखांचा गैरव्यवहार; दोन महिला लिपीकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत (Talegaon) माजी व्यवस्थापक आणि वरिष्ठ लिपिक महिलांनी मिळून 82 लाख 23 हजार 459 रुपयांचा गैरव्यवहार केला. याप्रकरणी दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2016 ते 2019 या कालावधीत घडला.

लेखापरीक्षक रोहित राजेंद्र पाटील यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : टास्कच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे सन 2016 ते 2019 या सालचे वार्षिक वैधानिक लेखापरीक्षण केले. लेखापरीक्षणा दरम्यान पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापक महिला आणि वरिष्ठ लिपिक महिला या दोघींनी आपसात संगनमत करून अपहार केला.

खातेधारकांच्या (Talegaon)जमा झालेल्या रकमा वेगवेगळ्या 11 दैनिक बचत प्रतिनिधींच्या खात्यावरून एकूण 72 लाख 39 हजार 193 रुपये आणि रोख रकमेतील नऊ लाख 84 हजार 266 रुपये याप्रमाणे एकूण 82 लाख 23 हजार 259 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.