Talegaon Dabhade : मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे, म्हणून ….. – प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज – मी एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. त्यामुळे मला एसटी कामगारांच्या व्यथा माहित आहेत. तुटपुंजा पगार, अपुऱ्या सोयी – सुविधा यामुळे आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचारी दबला गेला आहे, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी (दि. 13) भेट देऊन दरेकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवीण दरेकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, माजी नगराध्यक्ष ॲड. रविंद्रनाथ दाभाडे, पुणे जिल्हा सचिव संजय वाडेकर, उपाध्यक्ष सचिन आरते, हिम्मतभाई पुरोहित, संजय जाधव, सरचिटणीस विनायक भेगडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, कामगार आघाडी उपाध्यक्ष अनिल शेलार, पंढरीनाथ दाभाडे, एसटी कामगार संघटना पदाधिकारी दिपक दगडकर, शरद पवार, प्रमोद नखाते, अमोल रणदिवे, गणेश मुंडे, कैलास बागुल, दिवाकर रोजतकर, धनंजय मुंडे, प्रकाश भोकरे, कदम, बबन कोटकुले आदी उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठींबा व्यक्त करत आपल्या नगर दौऱ्यादरम्यान दरेकर यांनी सर्व आंदोलन स्थळी भेट दिली. तळेगाव दाभाडे एसटी डेपो येथे बोलताना प्रविण दरेकर यांनी एसटीचे विलिनीकरण करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांची ससेहोलपट थांबवावी असे सांगितले.

मी सुद्धा एसटी कंडक्टरचा मुलगा असल्याने एसटी कामगारांच्या व्यथा मला माहित आहेत. तुटपुंजा पगार, अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचारी दबला गेला आहे. महाराष्ट्र सरकारने आंदोलन दाबण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असेही दरेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.