BJP : भाजपातर्फे पोलीस, महापालिका आयुक्तांना राष्ट्रपतींची प्रतिमा भेट!

एमपीसी न्यूज – देशाच्या इतिहासात पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. ही बाब देशातील वंचित, शोषित आणि आर्थिकदृष्टया दुर्लक्षीत घटकांसाठी आनंदाची बाब आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी (BJP) व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकूश शिंदे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्म यांची प्रतिमा कार्यालयात लावण्यासाठी भेट दिली.

Collector Dr. Rajesh Deshmukh : गृहप्रकल्पांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी विशेष मोहीम राबवा

माजी महापौर उषा ढोरे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,  प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, झामाताई  बारणे, अनुराधा गोरखे, अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सारिका लांडगे, शर्मिला बाबर, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, उषा मुंडे, निर्मला कुटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे विनोद मालू, धनंजय शाळीग्राम, विजय शिनकर, आबा मोरे यांच्यासह (BJP) पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.