Jadhavwadi : जाधववाडी येथे फ्लॅटमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; तिघांवर गुन्हा, एकास अटक

एमपीसी न्यूज – जाधववाडी येथील एका फ्लॅटमध्ये (Prostitution in flats at Jadhavwadi) सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. कारवाई करून एका महिलेची सुटका करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रामेश्वर प्रभाकर मुळे (वय 24, रा. जाधववाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह तुषार जाधव (पूर्ण नाव माहिती नाही) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांमधील भगवंता मोठे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील तुषार जाधव यांच्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका केली.

Pune : देशात निश्चित महागाई वाढली : उत्तरप्रदेश उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य

आरोपी रामेश्वर आणि एक महिला असे दोघेजण मिळून पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय (Jadhavwadi) करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उजीविका भागवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.