Bhik Mango Andolan : आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना दरमहा अर्थसहाय्य द्या;  महाराष्ट्र मजूर पक्षाचे  भीक मागो आंदोलन

एमपीसी न्यूज – आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना दरमहा अर्थसहाय्य द्यावे या मागणीसाठी आणि वाढत्या महागाई विरोधात  महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आणि  “भीक मागो आंदोलन” (Bhik Mango Andolan) करण्यात आले.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन नुकतेच झाले. महाराष्ट्र मजूर पक्षाचे भाऊसाहेब अडागळे, सचिव बाळासाहेब गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष मयूर गायकवाड, प्रवक्ता प्रकाश कदम, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सविता आव्हाड, वाहतूक अध्यक्ष सुरेश मिसळ, महिला शहराध्यक्ष मनीषा प्रधान, हवेली तालुका अध्यक्ष मनीषा रणदिवे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्ता तेलंग आदींसह महाराष्ट्र मजूर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Petroleum Business Partnership: व्हॉट्सअॅपद्वारे मिळालेले पेट्रोलियम व्यवसायामधील भागीदारीचे आमिष महागात, साडेपाच लाखांची फसवणूक

भाऊसाहेब अडागळे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार रोजच इंधन दरवाढ करीत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, पालेभाज्या, डाळी, तेल व इतर आवश्यक सेवा यांचे भाव वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबीयांची क्रयशक्ती संपुष्टात आली आहे. या वाढत्या महागाईचा सामना करणे दुर्बल घटकातील कुटुंबांना आता अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता केंद्र व राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक कुटुंबांना दरमहा पाच हजार रुपये अनुदान द्यावे. अन्यथा १ जुलै रोजी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचेरी समोर महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन (Bhik Mango Andolan) करण्यात येईल.

 

 

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती वापराचा गॅस यांचे रोजच भाव वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत आहे आणि जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होत आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भीक मागो आंदोलन (Bhik Mango Andolan) केले आहे. याची सरकारने दखल घ्यावी आणि दुर्बल घटकातील कुटूंबियांना मासिक पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.