Petroleum Business Partnership: व्हॉट्सअॅपद्वारे मिळालेले पेट्रोलियम व्यवसायामधील भागीदारीचे आमिष महागात, साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग करत वडिलांच्या पेट्रोलियम व्यवसायात भागीदारी (Petroleum Business Partnership) देण्याचे आमिष दाखवून आणि इंशुरन्सचे पैसे पाठविण्यास भाग पाडून एकाची 5 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे ते ऑगस्ट 2021 दरम्यान मोशीत घडली.  

Corona Vaccine : पालिकेच्या सांगवी रुग्णालयात 2.67 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस

याप्रकरणी धनंजय रामचंद्र सावंत (वय 38, रा. जय गणेश लॉन्स जवळ, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोझ मोर्गन या नावाने चॅटिंग करणा-या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रोझ या नावाने व्हॉटस्अॅपवर फिर्यादी सावंत यांच्याशी चॅटिंग केली. रोझने वडिलांच्या पेट्रोलियम व्यवसायामध्ये (Petroleum Business Partnership) भागीदारे देण्याचे आमिष फिर्यादी सावंत यांना दाखविले. या व्यवसायाठी इंशुरन्संचे पैसे मंगल सिंग या व्यक्तीच्या मुंबईतील युनीयन बँकेचे खात्यात 5 लाख 55 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. फिर्यादी सावंत यांना व्यवसायामध्ये भागीदारी दिली नाही. पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.