Stone thrown at the Head: चुलत बहिणीला मारल्याचा जाब विचारल्याने डोक्यात घातला दगड

एमपीसी न्यूज – ‘तु माझ्या चुलत बहिणीला का मारले, असे विचारल्याने टोळक्याने एकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली, डोक्यात दगड मारुन (Stone thrown at the Head) गंभीर जखमी केले. ही घटना 30 एप्रिल रोजी सिद्धार्थनगर, ओटास्किम निगडी पोलीस चौकीसमोर घडली.

Life Insurance : लाईफ इन्शुरन्स डी-अॅक्टीवेट करण्याच्या बहाण्याने ‘ओटीपी’ घेऊन लाखाची फसवणूक

 

याबाबत महिलेने शुक्रवारी (दि.10) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तायप्पा बाबु पवार (वय 40), सुनीता तायप्पा पवार (वय 36), तेजस तायप्पा पवार (वय 15), शाम  बाबु पवार (37, सर्व रा. ओटास्किम निगडी), विश्वास अशोक शिंदे (वय 28, रा. पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचा मुलगा राजेंद्र पवार याने गणेश पवार याला ‘तु माझ्या चुलत बहिणी कोमल हिस का मारले? असे विचारले. त्यावरुन गणेश याने राजेंद्र याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर गणेशने त्याच्या वडीलांना बोलावून घेतले. फिर्यादी व त्यांचा मुलगा राजेंद्र यास जीवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसले.

घरातील 30 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान केले. तसेच ओटास्कीम पोलीस चौकीसमोर तक्रार देण्यास गेले असता. आरोपींनी फिर्यादीचा मुलगा राजेंद्र याच्या डोक्यात दगड (Stone thrown at the Head) मारला. त्यामुळे मुलाच्या डोक्यातून  रक्तश्राव होत होता. आरोपी तायप्पा, सुनीता यांनी हाताबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.