Life Insurance : लाईफ इन्शुरन्स डी-अॅक्टीवेट करण्याच्या बहाण्याने ‘ओटीपी’ घेऊन लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – लाईफ इन्शुरन्स अॅक्टीव (Life Insurance) असून ते डी – अॅक्टीवेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन बँकेचा पासर्वड विचारुन 97 हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 मे 2022 रोजी सुस येथे घडली.

याप्रकरणी आशिष अशोक जैस्वाल (वय 36, रा. सुस, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

MLA Sunil Shelke : महागाव मधील कातकरी बांधवांना घरपोच मिळाले जातीचे दाखले

 

फिर्यादी आशिष यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन फोन आला. क्रेडीट कार्डवर लाईफ इन्शुरन्स अॅक्टीव (Life Insurance)  असून तो डी-अॅक्टीवेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला. तो ओटीपी फिर्यादी आशिष यांच्याकडून विचारुन  घेतले.  त्याद्वारे फिर्यादी आशिष यांच्या आयसीआयसीआय बँकेचा इंटरनेट बँकींगचा पासवर्ड बदलला. आशिष यांच्या क्रेडीट कार्डद्वारे फ्रॉड ट्रान्झेक्शन करुन 97 हजार 700 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.