Pune News : पुणे रेल्वे विभागासाठी अर्थसंकल्पात 1300 कोटींची तरतूद

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागाला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 1300 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग, (Pune News) घोरपडी येथे वंदे भारत एक्सप्रेस पीट लाईन, पुणे मिरज लोंढा मार्गाचे दुहेरीकरण या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे पुणे विभागातील प्रकल्पांना गती मिळणार आहे.

अर्थसंकल्पानंतर रेल्वे मंत्रालयाकडून शुक्रवारी पिंक बुक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 13 हजार 539 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये पुणे विभागाला सुमारे 1300 कोटी रुपये मंजूर झाले. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यात वंदे भारत साठी नवीन पिट लाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Vadgaon Maval : राष्ट्रवादी महिला आघाडीचा हळदी कुंकू समारंभ

पुणे विभागात डिझेल शेड, महत्वाच्या 18 रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन अंतर्गत विकास यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. (Pune News) त्याचबरोबर बारामती-लोणंद हा 54 किलोमीटरचा आणि फलटण-पंढरपूर हा 105 किलोमीटरचा नवीन मार्ग मंजूर केला असून, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुणे विभागातील काही मार्गावर ओव्हर ब्रिज उभारण्यासाठीदेखील मोठी तरतूद करण्यात आली आहे.

 

पुणे विभागातील कामे व निधींची तरतूद (कोटी रुपयांत)

– पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रीमॉडेलिंग – 25

– हडपसर टर्मिनलचा विकास – 2

– घोरपडीत वंदे भारत एक्सप्रेसची पिट लाइन – 50

– बारामती-लोणंद नवा रेल्वेमार्ग – 100

– फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग – 20

– पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण – 900

– हातकणंगले-इचलकरंजी नवा रेल्वेमार्ग- 2 कोटी

– पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग – 1000

राज्यातील नवीन रेल्वे मार्गिका मार्ग– तरतूद (कोटी रुपयांत)

– कल्याण-मुरबाड (उल्हासनगरमार्गे- 28किमी)- 100

– नगर-बीड-परळी (250 किमी)- 201

– वर्धा-नांदेड (पुसदमार्गे-270 किमी) – 600

– सोलापूर-उस्मानाबाद (तुळजापूरमार्गे-84 किमी)- 110

दुहेरीकरण/चौपदीकरण होणारे मार्ग व तरतूद (कोटी रुपयांत)

बेलापूर-उरण मार्गिका – 20

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका- 90

वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका – 150

मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका- 350

दौंड-मनमाड दुहेरीकरण – 430

जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका- 20

मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका- 350

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.