Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे स्वामी निरंजनानंद सरस्वती परमहंस यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्युज – मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. (Maval) श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे सोमवारी (दि. 26) हा प्रकाशन सोहळा पार पडला. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी कौतुक केले.

दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती( परमहंस महाराज) यांच्या शुभहस्ते व ह.भ.प. डॉ. स्वातीताई वेदक( प्रोजेक्ट मॅनेजर, श्री साईबाबा सेवाधाम), ह.भ.प. एकनाथ श्रीराम शेटे(मा. उपसरपंच, नवलाख उंबरे),भारत लक्ष्मण काळे( अध्यक्ष पत्रकार संघ मावळ तालुका), सुवर्णाताई संतोष कुंभार( मा. सभापती, पं स मावळ), ह.भ.प. शिवाजी पवार, ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे( अध्यक्ष), भरत येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, माता भगिनी व वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune News : PMPML च्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार 50 टक्के वेतनवाढ देणार

श्री पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ हे अत्यंत प्रामाणिकपणे व निस्वार्थी भावनेने काम करत आहे. त्यामुळेच हे मंडळ अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. बाल वारकरी शिबीर, (Maval) कार्तिकी व आषाढी वारीनिमित्त वारकरी सेवा, आरोग्य शिबीर इत्यादी सामाजिक उपक्रम या मंडळाने यशस्वीरित्या राबवले आहेत, अशी भावना वारंगवाडी येथील स्वामी निरंजन आश्रमचे ह.भ.प. स्वामी निरंजनानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.