Pune News : PMPMLच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार 50 टक्के वेतनवाढ देणार

एमपीसी न्यूज : नवीन वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पीएमपीएमएलच्या (Pune News) कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची वाढीव वेतनाची  50 टक्के रक्कम जानेवारी 2023 पासून दिली जाणार आहे. सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत आज मंगळवारी 27 डिसेंबर रोजी आदेश काढला जाणार आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ही माहिती दिली आहे.

शिंदे गटाचे पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीसाठी सोमवारी (26 डिसेंबर) बैठकही पार पडली. बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसार 50 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे भानगिरे यांनी सांगितले. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे भानगिरे यांनी सांगितले.

Pimpri News : नाताळा निमित्त दिव्यांग मुलांना घडविली मेट्रोची सफर

याशिवाय ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे आणि त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी, वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी, डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावीत. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृहे सुरू करावीत, (Pune News) अशाही मागण्या यावेळी भानगिरे यांनी बैठकीत केल्या. यावर लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन बकोरिया यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.