Bhosari News : महिलेचे 4 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील तब्बल 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे. (Bhosari News) ही घटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26) सायंकाळी घडली आहे.

महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीवरील अनोळखी इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Charholi News : स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी त्याने केला दुसऱ्याचा निर्घृण खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मुलीला शाळेतून घेऊन जात असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील 95 हजार रुपयांचे 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र व चैन असे (Bhosari News) दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.