Nigdi News : ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यास पर्वाच्या 11 पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय इतिहासातील विविध (Nigdi News) आणि महत्त्वाच्या पैलूंचा अभ्यास केला. त्यामध्ये राजकारण, संस्था जीवन, समाजकारण, सांस्कृतिक जीवन आणि आर्थिक अशा 12 विषयातील 60 उपविषयांचा अभ्यास करत त्यावर तयार केलेल्या 11 पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात आले.

25 जानेवारी 2022 ते 25 जानेवारी 2023 असे एक वर्ष विविध विषयांचा अभ्यासातून तयार झालेल्या पुस्तिकांचा औपचारिक प्रकाशन सांगता सोहळा शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांच्या हस्ते 25 जानेवारी 2023 रोजी पार पडला. या ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने शाळेतील विविध विभागांतील अध्यापक, पालक, विद्यार्थ्यांची एकत्रित मोट बांधली गेली. सुमारे 61 विषयांचे अभ्यास गट गेली वर्षभर एकत्र येऊन आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास करीत होती.

यानिमित्ताने प्रत्येक गटाच्या एकत्रित अशा वाचनाबरोबरच संस्था भेटी, व्यक्तीभेटी, क्षेत्रभेटीही झाल्या. या ज्ञान यज्ञातून निर्माण झालेल्या नवनीतातून 12 पुस्तिकांचे प्रकाशन 25 व 27 जानेवारी रोजी करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा तिघांनी आपल्या गटाने केलेल्या अभ्यासाची अत्यंत प्रभावीपणे, नेमक्या शब्दांत, अनेक दाखले देत मांडणी केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अजितराव कानिकटर यांनी अभ्यास संकल्पना, त्यामागील भूमिका त्यासाठी एकत्रित संकल्पाचे महत्व सांगितले.  विवेक कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना समाजातील दुष्ट शक्तींना आव्हान देण्यासाठी सुष्ट व्यक्तींनी एकत्र, (Nigdi News) संघटितपणे दिलेला लढा देण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. अभ्यास ही काही काळासाठी करण्याची गोष्ट नसून दीर्घकाळ चालणारा प्रवास आहे.

Talegaon News : डॉ. लक्ष्मण कार्ले यांना ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार जाहीर

देशकारणात प्रवेश घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. 25 वर्षांनंतरचे हवामान, दहशतवाद, साथीचे रोग, याबाबत सजग होऊन त्यातली संशोधन करणेही गरजेचे आहे. यानिमित्ताने स्वतःमधील क्षमता, जिद्द वाढविणे म्हणजेच अभ्यासाचे फलित आहे.

संचालक गिरीशराव बापट मार्गदर्शन करताना म्हणाले की, अभ्यासाच्या संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा त्यांच्या कामगिरीशी स्पर्धा करावी.(Nigdi News) आपल्या प्रत्येकासमोर देशभरात एकेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यावर भर देऊन तेच जिवीतकार्य ही ठरवावे. अभ्यास करताना आपल्याला समकालीन विचारांचे भान हवे. चांगल्या गोष्टींना खीळ घालणारी परिस्थिती बदलू शकू असा अभ्यास व्हायला हवा. असा संकल्प करायला हवा, असाही विचार त्यांनी आपल्या मनोगतात मांडला.

तर, 27 जानेवारी रोजी उर्वरीत सहा पुस्तिकांचे प्रकाशन माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. देशाच्या विकासात अग्रभागी असलेल्या महत्त्वाच्या 60 विषयांची निवड करून त्यावर विद्यालयाने गटातून केलेल्या अभ्यासाचे व सर्व सदस्यांचे कौतुक केले. तसेच या पुस्तिका आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाचायला द्याव्यात असेही सूचित केले.

या ज्ञान यज्ञाच्या अभ्यासाची मांडणी प्रदर्शन रुपाने मनोहर सभागृहाखाली 25 ते 28 जानेवारी दरम्यान करण्यात आली होती. हे प्रदर्शन परिसरातील सर्व शाळांसाठी आणि नागरिकांसाठी खुले ठेवले गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.