Talegaon News : डॉ. लक्ष्मण कार्ले यांना ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ (Talegaon News) नागपूर, महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण’ पुरस्कार यंदा गेली चाळीस वर्षे निःस्वार्थपणे रुग्णसेवा करणारे तळेगाव दाभाडे येथील पंचाहत्तर वर्षीय डॉ. लक्ष्मण कार्ले यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. लक्ष्मण कार्ले हे गरीब, गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. अनेक जीर्ण आजार झालेल्या रुग्णांना बरं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी केवळ रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने खालुंब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला असून, त्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांचे कार्य सुरू आहे.

त्यांनी वैद्यकीय सेवेत कायमच गरीब गरजूंना औषधोपचार देण्यात पुढाकार घेतला. त्यांनी 1993 मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपामध्येही उत्कृष्ट काम केले. तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन 5 लाखापेक्षा अधिक बॅग संकलन करून वेगवेगळ्या रक्तपेढीला वितरण केले.

Pune Crime : मारुंजी येथे अडीच किलो गांजासह एकास अटक

सामाजिक बांधिलकीतून मागील 20 वर्षांपासून ते (Talegaon News) मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शांतिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.