Punawale : मोबाईल लोन करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची 55 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मोबाईलचे लोन करून देतो म्हणत तक्रारदाराच्या ( Punawale )  कागदांचा गैरवापर करून 55 हजारांची फसवणूक केली आहे. ते 15 जुलै दरम्यान पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे घडला आहे.

सिकंदर श्रावण भालेराव ( वय 43 रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शरद बाळू जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Pune : कांदा उत्पादक व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी आरोपीकडून मोबाईल घेण्यासाठी मोबाईल लोनची मागणी केली होती . यावेळी आरोपीने फिर्यादीचे कागदपत्र फिर्यादी कडून घेतले व त्यांचा गैरवापर करत फिर्यादींना 49 हजार 938 रुपयाचे लोन करून दिले व बँकेची आऊटस्टँडिंग असलेली रक्कम रुपये 55 हजार 229 केली. फिर्यादी यांनी या प्रकरणी रावेत पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल ( Punawale ) केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.