Pune : मोबाईलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण

मिलिंद बेंबळकर यांचे मत; मराठी विज्ञान परिषदेतर्फे 'मोबाईल वापराचे परिणाम'वर व्याख्यान

एमपीसी न्यूज – “मोबाईलच्या अतिवापरामुळे तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक इन्स्टिट्यूट्स व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे डीएनए तुटून फ्री रॅडिकल तयार होतात. इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशातील मोबाइल वापराचे प्रमाण जास्त आहे आणि आजकालच्या टेलिकॉम कंपन्यांच्या विविध डेटा ऑफर्स आणि फ्री कॉलिंगमुळे अलीकडे हे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटातील व्यक्तींवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे मत रेडिएशनचे तज्ज्ञ मिलिंद बेंबळकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शिवाजीनगर येथील दि इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित ‘मोबाइलला वापराचे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मायक्रोवेव्ह रेडिएशनचे अभ्यासक सुरेश कर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., राजेंद्र सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते. कर्करोग, नपुंसकता तसेच डोकेदुखी, थकवा, बधिरपण येणे, यामुळे २० टक्के तरुण पिढी यामुळे ग्रासली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून रेडिएशनचे दुष्परिणाम सिद्ध झाले आहे. परंतु मोबाइलला मनुष्यांवर त्याच्या परिणाम होतो, हे सिद्ध नसल्याचे टेलिकॉम कंपन्या सांगतात. त्यामुळे मोबाईलचा वापर तारतम्यतेने करावा, असेही बेंबळकर यांनी सांगितले.

सुरेश कर्वे म्हणाले, “मानवीवस्तीत असलेल्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडियेशमुळे आणि मोबाईलच्या अतिवापराने येत्या दहा वर्षात कर्करोगाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर बेताने करणे गरजेचे आहे. मोबाइल तसेच इतर इलेकट्रोनिक उपकरणे ‘शॉर्ट टर्म युज’ साठी आहे. ६ मिनिटापेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरल्याने हिट वाढीस लागते. त्यामुळे त्याचा जास्त वापर टाळावा. मोबाईलवर बोलताना तो कानापासून दहा मिलीमीटर अंतरावर राहील याची काळजी घ्यावी. कानात घातले जाणारे हेडफोन्स तसेच ब्लु टूथ उपकरण म्हणजे कानात बसविलेला छोटा टॉवर, त्यामुळे आपण स्वःत हा आजरांना निमंत्रण देत आहोत. तसेच पालकांनी लहान मुलांना मोबाइल देणे सहसा टाळावे किंवा मोबाइल ऐरप्लेन मोड वर ठेवून द्व्यावा. त्यामुळे रेडिएशन चा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. लहान मुलांबरोबरच गरोदर महिलांनी देखील मोबाइल वापर टाळावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.