Pune : पुण्यात 117 फोटोग्राफर्ससह 203 जणांची फसवणूक; विदेशात नेऊन घातला गंडा

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये फसवणुकीचा नवा पॅटर्न समोर (Pune) आला आहे. शहर परिसरातील तब्बल 117 फोटोग्राफर्स, 51 मेकअप आर्टिस्ट, 20 मॉडेल्स, 6 स्टायलिस्ट, 9 हेड अशा एकूण 203 लोकांची 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला कंपनीचे सबस्क्रीप्शन घेण्यास भाग पाडून त्यांना विदेशात नेऊन गंडा घालण्यात आला. फोटोग्राफर आणि कलाकारांनी कशीबशी भारतात धाव घेत याप्रकरणी पोलिसात फिर्यादी नोंदवली आहे.

श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज सावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बीपी रासने अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांची कामाच्या निमित्ताने श्रद्धा अंदुरे यांच्याशी ओळख झाली. श्रद्धा हिने ऑफिसमध्ये बोलावून फिर्यादीला कामाचे आमिष दाखवले. त्यासाठी कंपनीचे सबस्क्रीप्शन घेण्यासाठी सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे भरून सबस्क्रीप्शन घेतले.

Pune : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

काही दिवसानंतर कंपनी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून (Pune) काम मिळण्यासाठी काही दिवसांचा ब्रेक घेण्यात आला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. दरम्यान फिर्यादी यांच्यासह 203 जणांचा एक ग्रुप बनविण्यात आला होता. सर्वांकडून पैसे घेऊन आरोपींनी अचानक काम मिळणार नसल्याचे सांगत आर्थिक फसवणूक केली.

फसवणूक झालेल्या लोकांमध्ये 117 फोटोग्राफर, 51 मेकअप आर्टिस्ट, 20 मॉडेल्स, 6 स्टायलिस्ट, नऊ हेड अशा एकूण 203 जणांचा समावेश आहे. या सर्वांची 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे सुरुवातीला समोर आले आहे. मात्र दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून फसवणुकीच्या रकमेची व्याप्ती 70 लाखांच्या घरात गेली आहे.

दरम्यान काही फोटोग्राफर आणि इतर कलाकारांना कामाच्या निमित्ताने विदेशात नेऊन त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली. फोटोग्राफर आणि इतर कारागीर कसेबसे भारतात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटोग्राफरची फसवणूक झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

यापूर्वी फोटोग्राफर्सना कामाच्या निमित्ताने हॉटेलमध्ये बोलावून त्यांना गुंगीचे औषध पाजून त्यांचे महागडे कॅमेरे आणि इतर साहित्य चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा प्रकारे फसवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.