Pune Corona Update : कोरोनाच्या 236 रुग्णांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू, 234 नवे रुग्ण

236 corona patients discharged, 10 died, 234 new patients

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 236 रुग्ण आज, सोमवारी ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 234 नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे आज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.

सध्या शहरात कोरोनाच्या 230 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात आता 9 हजार 890 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत.

पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 986 आहेत. या रोगामुळे आतापर्यंत 458 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 6 हजार 446 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज कोरोनाच्या 2 हजार 234 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

कोरेगाव पार्कमधील 47 वर्षीय, गंगाधाम चौकातील 60 वर्षीय व कोंढाव्यातील 82 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, दत्तवाडी रोड परिसरातील 64 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 55 वर्षीय पुरुषाचा नगर रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 69 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पूल भागातील 42 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 75 वर्षीय पुरुषाचा डी. एच. औंध हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडीतील 73 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, गोखलेनगरमधील 90 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.