Pune : येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे 5 सामने पुण्यात होणार

एमपीसी न्यूज – पुणेकर क्रिकेट प्रेमींना (Pune) आता एक भव्य संधी समोर येत आहे. 2011 नंतर पाहिल्यांदा भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक होणार आहे तर पुणेकरांना अवघ्या 27 वर्षांनंतर विश्वचषकाचा सामना पुण्यामध्ये प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे.  

त्यामधील 5 सामने हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत. पुण्यातील गहुंजे इथे हे मैदान आहे.  यंदाच्या विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश हा पहीला सामना 19  ऑक्टोबर 2023 ला  पुण्यात  होत असून, पुणे परिसरातील भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना व तमाम क्रिकेट प्रेमींना सोन्याची संधी समोर आली आहे. फक्त भारत विरुद्ध बांगलादेश हाच सामना नसून न्यू झीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका व ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश हे हाय प्रोफाइल सामनेही पुण्यात होणार आहेत.

अजून पर्यंत क्वालिफायर 1 व क्वालिफायर 2 चे मानकरी कोण आहेत हे कळाले नाही आहे. परंतु क्वालिफायर 2 च्या संघाचा अफगाणिस्तानशी सामना होणार आहे, तर क्वालिफायर 1 संघाचा सामना इंग्लंडच्या संघाशी होणार आहे.

पुण्यात होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक

19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश
30 ऑक्टोबर: अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर – 2
१ नोव्हेंबर      : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
8 नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर-1
12 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश

भारताचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा तसेच आयपीएलमुळे प्रसिद्ध झालेले काही आंतरराष्ट्रीय खेळाडू जसे की रशीद खान, बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, स्टीवन स्मिथ, केन विलियम्सन सारख्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहण्याचा मौका व उच्च गुणवत्तेचा खेळही बघायला (Pune) मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.