Pune :  शहरात 7 जणांचा मृत्यू; नवे 86 कोरोना रुग्ण, 52 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज  : पुण्यात कोरोनाची दहशत कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतीच आहे.  आज (बुधवारी) कोरोना संसर्गाचे 86 नवे रुग्ण दाखल झाले, कोरोनाबाधित 7 जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात 52  रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 79  क्रिटिकल रुग्णावर उपचार चालू असून त्यातील 18 जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  आत्तापर्यंतच्या रेकॉर्डनुसार शहरात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दोन हजारचा आकडा ओलांडला असून ती संख्या  2029, अॅक्टिव्ह रुग्ण 1324, कोरोनाबाधित मृत्यू 118 आहेत.

शहरात आज (बुधवारी) तब्बल 7 जणांचा या रोगामुळे बळी गेला. यामध्ये 3  मृत रुग्ण  ताडीवाला रोड भागातील आहेत. हे सर्व जेष्ठ नागरिक आहेत. आतापर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 118 झाली आहे.  दिवसभरात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, कोरोनाचा संसर्ग झालेले 52 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पद्मावती भागात राहणाऱ्या 67 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर भागातील 75 वर्षीय महिलेचा वायसीएम पिंपरी हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 58 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, याच  भागातील 75 वर्षीय  महिलेचा आणि 68 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवडा भागातील 69  वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (कोथरूड), बिबवेवाडी भागातील 80 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्याचे कोरोना हॉटस्पॉट झालेल्या 5 वॉर्डात सातत्याने रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.