Pune : महिला वाहतूक पोलिसाचा हात पिरगळणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

A case has been registered against a woman for twisting the arm of a woman traffic policeman

एमपीसी न्यूज : ‘झेब्रा क्रॉसिंग’वर थांबलेल्या महिलेच्या दुचाकीवर कारवाई करण्यासाठी पुढे आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घालून तिचा हात पिरगळणाऱ्या एका महिलेविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुया, ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक ए. ए. दिवेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक दिवेकर या मुंढवा चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. यावेळी अनुया त्या चौकात आल्या. त्यांनी आपली दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली. हे पाहून दिवेकर या कारवाई करण्यासाठी पुढे आल्या.

त्यांनी अनुया यांच्या दुचाकीचा फोटो काढला. मात्र, फोटो काढल्याचा राग आल्याने अनुया हिने दिवेकर यांच्याशी वाद घालत त्यांचा हात पिरगळला.

या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रेजितवाड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.