Pune : शाश्वत विकासासाठी निश्चित स्वरुपाची आखीव चौकट अनिवार्य

एमपीसी न्यूज – जीवनाच्या सर्व क्षेत्रात शाश्वत विकासाची (Pune) संकल्पना महत्त्वाची आहे. मात्र, या संकल्पनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली पाहिजे. तसेच अंलबजावणीसाठी निश्चित स्वरुपाची आखीव चौकट अनिवार्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

जे. पी. श्रॉफ फाऊंडेशन आणि सस्टेन अँड सेव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘सस्टेनिबिलिटी क्र्यूसेडर सन्मान’ प्रदान समारंभात ते बोलत होते.

रॉयल कॅनाट बोट क्वब येथील सभागृहात हा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी फाईव्ह एफ वर्ल्डचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन हे होते. सन्मान निवड समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योगपती प्रदीप भार्गव, संयोजक जे. पी. श्रॉफ, ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया तसेच सारडा ग्रुपचे अध्यक्ष कमल सारडा व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी सस्टेन अँड सेव्ह या नव्या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण डॉ. अभय फिरोदिया आणि कमल सारडा यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाच्या संचालक प्रणती श्रॉफ मुनोत आणि अंकिता श्रॉफ सारडा यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी या नव्या उपक्रमा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली.

कार्यक्रमा दरम्यान प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद (Pune) चौधरी (कॉर्पोरेट लीडरशिप), पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग (ग्रीन गव्हर्नन्स), राज्यसभा खासदार वंदना चव्हाण (वैयक्तिक ग्रीन कार्यकर्ता), के के नाग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलन नाग व एस ए ग्लास प्रायव्हेट लिमिडेटचे आदित्य आगरवाल (ग्रीन स्मॉल अँड मिडियम एन्टरप्राईज) तर तृप्ती आगरवाल (ग्रीन एज्युकेशन), पॅडकेअर लॅब्जचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य धारिया (सस्टेनिबिलिटी स्टार्ट अप) यांना यावर्षीचे शाश्वत विकास सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. अभय फिरोदिया म्हणाले, “कुठल्याही समस्येच्या निराकरणासाठी पुणे हे पुढाकार घेणारे शहर आहे. सर्व विषयातील, क्षेत्रातील निष्णात, तज्ज्ञ मान्यवरांचे वास्तव्य पुण्यात आहे.

विशेषतः पर्यावरण संबंधित तज्ज्ञांची विपुलता पुण्यात आहे. शाश्वत विकासाचा मुद्दा पर्यावरणाशी प्रामुख्याने निगडीत आहे. या पार्श्वभूमीवर श्रॉफ फाऊंडेशनने शाश्वत विकासाचे अग्रदूत असणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला, तो स्वागतार्ह आहे.”

या कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘फ्युचर ऑफ सस्टेनिबिलिटी’ या मध्यवर्ती विषयाला अनुसरून एका परिचर्चेचे आयोजनही करण्यात आले होते.

त्यामध्ये कॉन्सुलेट जनरल यूएस, मुंबईचे डेप्युटी प्रिन्सिपल ऑफिसर मायकेल श्रूकर, एव्हरसोर्स कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक अनुप पोद्दार, हनीवेल ऑटोमेशन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड यांच्यासह डॉ. गणेश नटराजन सहभागी झाले होते. ‘फ्युचर ऑफ सस्टेनिबिलिटी’ या विषयावर यावेळी वक्त्यांनी मोजक्या शब्दांत सस्टेनिबिलिटीच्या भावी दिशा काय असाव्यात, याविषयी विचार मांडले.

Pune : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगणार साहसी एसआरटीएल मॅरेथॉन स्पर्धा

बीजभाषण करताना अनुप पोद्दार यांनी उद्योग, उर्जा, इलेक्ट्रिसिटी आदी विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासाला अनुसरून धोरणनिश्चिती कऱण्याची गरज असल्याचे सांगितले. आशिष गायकवाड म्हणाले, शाश्वत विकासाच्या संकल्पना जीवनाच्या विविध क्षेत्रांत नेमक्या कशा पद्धतीने राबविता येतील, याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

धोरण आखले तरी त्यांची अंमलबजावणी करताना आवश्यक ती लवचिकता असणे गरजेचे आहे. मायकेल श्रूडर यांनी अमेरिका आणि भारत, या दोन देशांचे संबंध दीर्घकालीन मैत्रीचे असून, नजिकच्या भविष्यात ते अधिक मजबूत होतील. उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान ही क्षेत्रे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असे सांगितले.

शाश्वत विकासाची संकल्पना अवघ्या मानवजातीसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची असून, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विकास, प्रगतीच्या संकल्पना शाश्वततेशी निगडीत असल्या पाहिजेत आणि प्रत्येक समाजघटकाला त्या सामावून घेणाऱ्या असाव्यात, अशी अपेक्षा डॉ. गणेश नटराजन यांनी व्यक्त केली.

फाऊंडेशनचे आधारस्तंभ जे. पी. श्रॉफ यांनी सन्मानप्राप्त संस्था आणि व्यक्तींचे अभिनंदन केले आणि फाऊंडेशनतर्फे हे सन्मान दरवर्षी प्रदान केले जातील, अशी घोषणा केली. नम्रता धामणकर यांनी आभार मानले. सिद्धार्थ भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.