Pune : तय्यबीया अनाथ आश्रमात मध्यरात्री लागली आग

एमपीसी न्यूज : काल (26 डिसेंबर) मध्यरात्री ईस्ट स्ट्रीट कॅम्पमधील (Pune) तय्यबीया मुलांचे अनाथ आश्रम या चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले. 

या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास वयोगट 6 ते 16 वर्षांच्या 100  मुलांना आगीपासून दूर सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे स्थलांतरित केले. व आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टळला.

Smart City: केबल नेटवर्क प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले – नाना काटे

या आगीमधे इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे व इतर काही साहित्याचे नुकसान झाले आहे. आग मध्यम स्वरुपाची असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे समजले.

या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन (Pune) अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.