Smart City: केबल नेटवर्क प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले – नाना काटे

एमपीसी न्यूज – दुबई, पाकिस्तानातील (Smart City) गुन्हेगारांशी संबंधीत कपंनीकडे पिंपरी -चिंचवड शहरातील इंटरनेट केबल नेटवर्क सोपविण्यासाठी भाजपने आटापीटा केला. पुरावे मिळताच सत्ताधारी दुटप्पी, भ्रष्ट, भंपक भाजप नेत्यांचा हा बुरखा राष्ट्रवादी काँग्रेसने टराटरा फाडल्यानेच आता भाजप नेत्यांची अक्षरशः तंतरली आहे. या प्रकरणात महापालिका निवडणुकीत हात पाय भाजणार आणि तोंडही पोळणार असे दिसताच भाजपचे माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांचे बाहुले पुढे करून `मी नाही त्यातली…` अशा थाटात आव आणत उलटपक्षी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्यांची अवस्था केविलवाणी आहे. केबल नेटवर्क प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले असल्याचे प्रत्युत्तर माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिले.

स्मार्ट सिटी प्रशासनाच्या माध्यमातून शहरात इंटरनेट नेटवर्किंगसाठी तयार केलेले अंडरग्राउंड डक्ट भाड्याने देण्याच्या कामात दुबई, पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संबंधीत कंपनीकडे काम सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शहरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, महिला मुलींची सुरक्षा संकटात येऊ शकते, डेटा चोरी, सायबर हल्ले होऊ शकतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी निदर्शनास आणले होते.

हा निर्णय तत्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी महापालिका आयुक्त आयुक्त यांना भेटून दिला होता. चहुबाजुंनी त्याबाबत भाजपवर टीका होऊ लागल्याने सोमवारी (दि.26) भाजपचे ढाके यांनी प्रसिद्धीपत्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या कामात राष्ट्रवादीचाच छुपा हात आहे असे आरोप केले होते. त्यावर प्रसिद्धीपत्र काढून काटे यांनी भाजपला चोख उत्तर दिले.

Chinchwad News: नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शौर्याचे प्रदर्शन

नाना काटे म्हणाले, नामदेव ढाके यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे. ढाके हे निव्वळ बोलके बाहुले आहे. आज त्यांचा वापर केला जातोय. उद्याच्याला त्यांची स्थिती `घर का ना घाटका` अशी होणार आहे. राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या ढाके यांनी अगोदर या विषयाचा थोडासा गृहपाठ केला (Smart City) असता तर बरे झाले असते. ढाके यांचा अज्ञानीपणा उघड झाला आहे. या विषयाला 5 जुलैला मान्यता दिली असे ढाके म्हणतात. पण, त्याकाळात ही मान्यता देणारेसुद्धा शिंदे-फडणवीस यांचेच सरकार होते. महाआघाडी सरकराच्या काळातील नाही तर, शिंदे – फडणवीस यांच्या काळातील हे प्रकरण आहे, असल्याचा पलटवार काटे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.