Pune : देशभरातील पॉटर्सच्या उपस्थितीत पुण्यात रंगतोय भव्य पॉटरी फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज – पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या(Pune) आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी तिसऱ्या मेगा पॉटर्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. येत्या रविवार (दि.22) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यान सदर फेस्टिव्हल सुरु राहणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

या टप्प्यात 24 आणि पुढील टप्प्यात 24 असे देशभरातील (Pune)तब्बल 48 पॉटरी कलाकार या फेस्टिव्हलमध्ये सहभागी असणार आहेत. मातीपासून बनविलेल्या कलात्मक वस्तू, दागिने, शिल्पे, भित्तीचित्रे यांसोबतच मातकाम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधत ही कला जवळून अनुभविण्याची संधी पुणेकरांना यानिमित्त अनुभविता येईल.

Pune : कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे : आम आदमी पार्टी

पॉटरी फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणारे कलाकार यांचा सहभाग आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. हा पॉटरी फेस्टिव्हल पुढील आठवड्यात 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यानही असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.