NCP : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाल्याने राष्ट्रवादीचा आंनदोत्सव

एमपीसी न्यूज – राज्या शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याने (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की, भाजप प्रणित( NCP)महाराष्ट्र सरकारने आणलेला कंत्राटी भरतीचा जीआर हा अन्यायकारक होता. याच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बरोबरच इतर विद्यार्थी संघटना देखील आक्रमकपणे या जीआरच्या विरोधात आंदोलन करीत होत्या. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सामूहिक शक्तीपुढे आज भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांना झुकावे लागले.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात मुलींचा रास दांडिया कार्यक्रम

राज्यातील तमाम विद्यार्थी व विद्यार्थी संघटना यांचा हा विजय आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासनाच्या शासकीय शाळांचे खाजगीकरण, एकत्रिकरण व दत्तक योजना या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे.त्याचबरोबर शाळा संदर्भातला हा निर्णय देखील आम्ही शासनाला मागे घ्यायला भाग पाडू.

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, “गेल्या नऊ वर्षापासून भारतात सरकारी संस्था सरकारी कार्यालय खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने केला असून त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी भरती हा जीआर काढण्यात आला होता परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यभरात विविध शहरात आंदोलन घेऊन महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण केला.

यामुळे महाराष्ट्र सरकारला त्यांनी घेतलेल्या या तुघलकी निर्णयाला मागे घ्यावा लागला.वाढती महागाई आणि बेरोजगारी या विरोधात तरुणाई मध्ये भाजप सरकार विरोधात प्रचंड रोष असून पिंपरी चिंचवड शहरातील युवक मतपेटीतून भाजपचा विरोध करतील” असे इम्रान शेख म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, संदिप चव्हाण, राजेश हरगुडे, राहुलपवार,सागरभाऊ तापकीर, शारदा चोकशी/काटे,स्वप्नाली असोले,अक्षय शेडगे, हर्षद परमार, सूरज देशमाने, नितीन मोरे,अभिषेक कांबळे,राहूल नेवाळेविशाल क्षीरसागर , विक्रम गजभट्टे, शाहिद शेख ,ओम शिरसागर रजनीकांत गायकवाड मेघराज लोखंडे ,अनिकेत बिरंगल आणि मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.