Pune: भारतीय मजदूर संघाच्या वतीने असंघटीत आणि बांधकाम कामगारांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज-  कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सरकारने लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कामगारांच्या समस्यांना प्रतिसाद देत भारतीय मजदूर संघाच्या वतीने त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

पुणे शहरात परराज्यातून कामधंद्यासाठी आलेल्या मजुर, बांधकाम कामगार आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार यांची माहिती अखिल भारतीय मजदूर महासंघाचे पदाधिकारी,  सचिन मेंगाळे, देवेंद्र कौशिक यांनी गोळा केली. या माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी मध्ये काम करणार्या ओरिसा मधील महिला कामगारांना धान्याचे किट देण्यात आले. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणारे छस्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातील कामगारांना पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाटप करण्यात आले.

ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज, डेक्कन चेंबर ऑफ काॅमर्स नगर रोड आणि भारतीय मजदूर संघ पुणे यांच्या वतीने नगर रोड परिसरातील 50 पेक्षा जास्त  कुटुबांना प्रत्येकी  1000 रूपयांचे धान्य किट वाटप करण्यात आले. तसेच खराडी  येथील 20 कुटुंबांना मार्क इंडस्ट्रीज व भारतीय मजदूर संघच्या वतीने, धान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे मधील वराळे येथील 10 कुटुंब आणि भोसरी येथील 12 कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले

शिरूर येथील भारतीय मजदूर संघाच्या सभासद असलेल्या कंपनीमधील कामगारांनी  या कामासाठी एका दिवसाचे वेतन देऊ केले.

या उपक्रमासाठी डेक्कन चेबर्स ऑफ काॅमर्स चे उपाध्यक्ष हरी कृष्ण श्रीवास्तव, ओरिएंटल रबर कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक मुस्तफा, राहुल वाबळे, कामगार प्रतिनिधी किरण ठोकले, रमेश ढोकले, सुभाष गावडे, बापु गव्हाणे. मार्क इंडस्ट्रीजचे मालक अजित कर्नावट, कामगार प्रतिनिधी प्रकाश टिळेकर, भोसरी येथील कार्यकर्ते प्रदीप गायकवाड, सचिन बनकर, तळेगाव दाभाडे येथील विजय भेगडे, प्रदीप बनसोडे, नितीन मराठे, पॅक इन इंडिया रांजणगाव येथील पळसकर परमेश्वर, कामशेत मधील राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे  प्रसाद ऊंडे तसेच भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष हरी सोवनी, सचिन मेंगाळे, बाळासाहेब भुजबळ, अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, अभय वर्तक, अजेंद्र जोशी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.