Pune : शुक्रवार पेठेत भरधाव वेगातील दुचाकी घसरली, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील शुक्रवार पेठेत 24 जून च्या रात्री भीषण (Pune) अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्याने दुचाकी स्वराचे डोके रस्त्यावर आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

अभिजीत रवींद्र पावसे (वय 31) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Pimpri : वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अभिजीत वनराज मंडळाकडून स्वारगेटच्या दिशेने जात होता. भरधाव दुचाकी चालवत असताना त्याच्या डोक्यावर हेल्मेटही नव्हते. त्याची दुचाकी स्लिप झाल्याने तो रस्त्यावर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून नाका तोंडातून रक्त आले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.