Pune : पाऊस आल्याने आडोशाला थांबलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

एमपीसी न्यूज – पाऊस आल्यामुळे आडोशाला थांबलेल्या एका तरुणाचा (Pune) तारेच्या कंपाऊंडला हात लागला. या तारेच्या कंपाउंड मध्ये विजेचा प्रवाह असल्याने तरुणाला जोरात विजेचा झटका लागला. यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. कोंढवा खुर्द येथील ब्रह्मा इस्टेट सोसायटीच्या तारांच्या कंपाउंड शेजारी शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

Pune : शुक्रवार पेठेत भरधाव वेगातील दुचाकी घसरली, तरुणाचा मृत्यू

अजय कुमार विनोद कुमार वर्मा (वय 30, शिवनेरी नगर कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील विनोद कुमार वर्मा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मोठा मुलगा अजय कुमार वर्मा हा कामानिमित्त बाहेर गेला होता. कोंढवा खुर्द येथील ब्रह्मा इस्टेट सोसायटीच्या समोरून जात असताना पाऊस आल्याने तो आडोशाला थांबला होता. यावेळी सोसायटीच्या तारेच्या कंपाऊंडला त्याचा हात लागला. यामध्ये विजेचा करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. सोसायटीच्या तारेच्या कंपाउंड मध्ये करंट कोणी सोडला त्याचा तपास आता पोलीस करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.